उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मनरेगा तून मदत प्रस्ताव कृषीमध्ये कोकाटे यांचे बच्चू कडू यांना आश्वासन
"कृषीमंत्री कोकाटे यांचे बच्चू कडू यांना आश्वासन" शेतीमाल पेरणी ती कापणी पर्यंतचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मनरेगांमधून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार) काही भार उचलावा, अशी मागणी प्रहार संघटनेचे माझे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. यावर मनरेगातून मदत मिळावी यासाठी समितीमार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवू आणि रोजगार हमी योजनेतून काही मदत देता येते का याची चाचणी करू अशी आश्वासन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले. शेतकरी कर्जमाफी, किमान हमीभाव आणि अन्य विषयांवर कृषिमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर केंद्र होईल,असे कोकाटे यांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी करण्याबाबत मनरेगा मध्ये समावेश करण्याबाबत समिती स्थापन करून समितीकडून प्राप्त शिफारशीनुसार केंद्र शासनाला यांचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वा...