उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मनरेगा तून मदत प्रस्ताव कृषीमध्ये कोकाटे यांचे बच्चू कडू यांना आश्वासन

"कृषीमंत्री कोकाटे यांचे बच्चू कडू यांना आश्वासन"

         शेतीमाल पेरणी ती कापणी पर्यंतचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मनरेगांमधून (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार) काही भार उचलावा, अशी मागणी प्रहार संघटनेचे माझे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. यावर मनरेगातून मदत मिळावी यासाठी समितीमार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवू आणि रोजगार हमी योजनेतून काही मदत देता येते का याची चाचणी करू अशी आश्वासन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले.

         शेतकरी कर्जमाफी, किमान हमीभाव आणि अन्य विषयांवर कृषिमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर केंद्र होईल,असे कोकाटे यांनी सांगितले.

          उत्पादन खर्च कमी करण्याबाबत मनरेगा मध्ये समावेश करण्याबाबत समिती स्थापन करून समितीकडून प्राप्त शिफारशीनुसार केंद्र शासनाला यांचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन यावेळी कोकाटेने दिले. कोकाटे म्हणाले ,की शेती विषयक केंद्र शासनाच्या धोरणाबाबत सुधारणा करण्यासाठी राज्याच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.

         शेतीविषयक आयात निर्यात धोरणाबाबत राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व केंद्रिय कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ सहजरीत्या मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील.शेतीसाठी असलेली. ऍग्रीस्टॅक ही डिजिटल ओळखपत्र प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबवणार असून यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवणे, कोणत्या हंगामात कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन करणे,शेतकरी संघटनांकडून कृषीविषयक असलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार कृषी योजना सुधारणा करण्यात येतील.पिकनिहाय माहिती घेऊन पीक पद्धती राबविण्याबाबत देखील शेतकऱ्यांना माहिती देऊ, शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले.



Comments